चौके (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या निर्देशखाली काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’, गोवा आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ, ड्रग्ज अशा नशा विरोधी कार्यशाळेचे विशेष आयोजन करून शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना यांच्या दुष्परिणामाबद्दल जागृत करून या विरोधात कसं लढायचं यांचे विशेष मार्गदर्शन सिनियर इन्स्पेक्टर मंगेश पेडणेकर आणि सब इन्स्पेक्टर पडते आणि यांच्या टीमने केले. यावेळी ड्रग्ज विषयी महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर आम्ही ‘नशा करणार नाही’ अशी शपथ सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली तसेच मुलांना स्लाईड शो द्वारे यांचे दुष्परिणाम व त्या माध्यमातून होणारे सामाजिक परीणाम या द्वारे कोणती सावधानता तसेच. ‘नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोमध्ये’ नोकरीच्या संधी अशा विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या वतीने अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते या टीमला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय (सं) कट्टा च्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य चे प्रा. आर. जी. गावडे, सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षिका प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.