प्रशांत गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान
आचरा (प्रतिनिधी) : जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचे शिक्षक प्रशांत अण्णा गोसावी यांना नुकताच कोल्हापूरच्या अविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर झाला होता. हा पुरस्कार माणगाव(रायगड) कुणबी भवन येथे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रविवार 22 सप्टेंबरला प्रशांत गोसावी यांना अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कुमार पवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावले, एसटी महामंडळ अध्यक्ष, अविष्कार फाउंडेशनचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत गोसावी हे जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे गेली 26 वर्षे शिक्षक म्हणून सेवा देत असून इंग्लिश, विज्ञान या विषयाचे अध्यापण करीत आहेत. यापूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि संस्कृत हे विषय शिकवत त्या विषयात शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी अनेक वर्षे कायम राखली होती. पुरस्कार प्राप्ती नंतर संस्था अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना)सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रविण घाडीगावकर, सर्व शिक्षक, कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी, पालक तसेच नाथ गोसावी समाज सिंधुदुर्ग यांच्या कडून त्यांचे अभिनंदन होतं आहे.