ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटनेकडून शासन निर्णयाचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.राज्य शासनाच्या या निर्णया़चे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटना स्वागत करत असल्याचे संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी सांगितले

ग्रामसेवक (एस-8) व ग्रामविकास अधिकारी (एस 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25500 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मुळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस 14) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस 15) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस 20) असा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!