करुळ व भुईबावड्यात ढगफुटी ; घाटात दरड कोसळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. भुईबावडा व करूळ या सह्याद्री पाट्यात ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूर कडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाले आहे.दरड कोसल्यामुळे घाटात एस टी बस सह अन्य वाहने अडकून पडली आहेत. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घाटात दाखल झाले व सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.

सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यातील करुळ, भुईबावडा व इतर गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने भुईबावाडा घाटात नाल्याचे स्वरूप आले. तर दोन ठिकाणी मोठया दरडी कोसळ्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. मात्र तोपर्यंत काळोख झाल्यामुळे मार्ग मोकळा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तर करूळ येथे झालेल्या ढग सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला. गावातून वाहणाऱ्या नद्याना महापूर आला आहे. तर अनेक काॅजवे पाण्याखाली गेल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी घाट मार्गात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
करुळ घाट वाहतुकीला बंद आहे. या घाटात देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.नदी काठाच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी व ओहळाच्या   काठावर असलेले भात शेती ही जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, श्री जायभाय, सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरडवण्याचा प्रयत्न  मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे या कामात अडथळा येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!