शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेचा लाभ घ्यावा ! ; मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे आवाहन 

मसुरे (प्रतिनिधी) : भात पिकाचे कापणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत  कृषि विभागामार्फत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजना ७५ टक्के अनुदान तत्वावर राबविण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत शेतक-यांचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २७/०९/२०२४ असुन तालुका कृषि अधिकारी यांचे स्तरावर अर्ज स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे. 

सदर योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हे. क्षेत्र भात पिकाखालील असावे. एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना  प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद [कृषी विभाग] सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. रु. २०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. १५०० प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. तसेच एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त १ ताडपत्री खरेदी करता येईल.  सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजने करीता ७/१२, ८ अ, बैंक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजे ३१०० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  २७.०९.२०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!