सहदेव घाडीगांवकर यांची वागदे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती नूतन अध्यक्ष पदी श्रीधर सहदेव घाडीगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली., सरपंच संदीप सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच माजी अध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी गेले वर्षभर अध्यक्ष पदावर केलेल्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच विशाल गावडे, ग्राम सदस्य नीलम पालव, सुप्रिया काणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!