गावाने केला फटाके फाेडून जल्लाेष साजरा
कुडाळ (प्रतिनिधी) : आर.आर.पाटील (स्मार्ट ग्राम) सुंदर गाव स्पर्धेत कुडाळ तालुक्यात तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत प्रथम आली आहे. स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये तालूक्यात तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने 1 नंबर पटकावित 10 लाख रु चे बक्षीस प्राप्त केले आहे.गावाला मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तेर्से बांबर्डे गावच्यावतीने माेठा जल्लोष साजरा करण्यात आला.
स्मार्ट ग्राम स्पर्धेसाठी रुपेश कानडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल फटाके फोडून तेर्सेबांबर्डे गावात जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच रोहिणी हळदणकर, सदस्य संतोष डीचोलकर, सदस्य गुणाजी जाधव, सदस्य अजय डीचोलकर, सदस्य महेंद्र मेस्त्री, सदस्या प्रणाली साटेलकर, सदस्या माधवी कानडे, ग्रामसेवक भूषण बालम, शिपाई निलेश सडेकर, डेटा ऑपरेटर छाया डीचोलकर, मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी शुभम कानडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.