आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आणि ज्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देऊन जवानांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला असे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची 120 वी जयंती मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपसरपंच दिपक सुर्वे व चिंदर बाजार पोलीस पाटील दिनेश पाताडे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि पं. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर, समीर अपराज, रोशनी फर्नांडीस, रोहिणी केळसकर, आदित्य कावले आदी उपस्थित होते.