जि.प.शाळा तरंदळे नं 1 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ग्रामपंचायत तरंदळे व लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे चे आयाेजन : सरपंच सुशिल कदम यांचा पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत तरंदळे व SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच जिल्हा परिषद शाळा तरंदळे नं. 1 येथे संपन्न झाले.या आराेग्य शिबिरात 85 जणांनी तपासणी करुन घेतली.यावेळी त्यांना माेफत ओषधे देण्यात आली.

जि.प.शाळा तरंदळे नं 1 येथील माेफत आराेग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.सरपंच सुशिल कदम यांनी आरोग्य विषयी माहिती तसेच बीसीजी लसीकरण बद्दल माहिती दिली.बिसिजी लस मुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. म्हणून चांगले आरोग्य असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ प्रकाश घोगळे नेफ्रोलॉजी, डॉ योगेश केद्रे ऑर्थोपेडिक सर्जरी, डॉ संजय जोशी नेत्रतज्ञ,डॉ निशा धुरी, डॉ निलेश मेहतारे वैद्यकीय अधिकारी, डाॅ.धनंजय रासम आदींनी तपासणी केली.यावेळी आरोग्य सेविका माईणकर तसेच आरोग्य स्टाप,नर्स उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरा प्रसंगी उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनील दत्त, जाधव,नेहा घाडीगावकर,दीपक घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच सुधीर सावंत,मुख्याध्यापक चंद्रशेखर पोकळे,पोलीस पाटील संजय खरात,आणि गावातील ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!