आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील रहिवासी चंद्रशेखर श्रीधर कोरगावकर यांचे मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे, भाऊ, भावजया, असा मोठा परिवार आहे. चिंदर गावडेवाडी जय हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे भजनी बुवा, चिंदर सेवा संघांचे सहखजिनदार आशिष कोरगावकर यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.