समाजातील निरपेक्ष भावनेने कार्य करणा-या माणसांमुळे हे जग चालते – लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे हस्ते झाला संदिप परब यांचा गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार वंचित, बेघर व्यक्तींसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आश्रम, शेल्टर होम व डे केअर सेंटर द्वारे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्तै संदिप परब यांना जियान्ट्स वेल्फेअर फौंडेशन या संस्थेकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत संदिप यांना पुरस्काराचे सन्मानचिन्ह ट्राँफी व शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून असलेले गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मान. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी,” समाजात निरपेक्ष भावनेने काम करणारी माणसं असतात. त्यामुळे हे जग चालत असते.” अशा शब्दांत सर्व पुरस्कार्थीं मान्यवरांचा गौरव केला.जियान्ट्स वेल्फेअर फौंडेशन फेडरेशन -१० चे प्रेसिडेंट सुदान नाईक गोयंकर ,उमेश नाईक,सहेली डाँ.स्वाती दिवाकर यांचेसह जियान्ट्स वेल्फेअर फौंडेशनचे पदाधिकारी जियान्ट्स व सहेली उपस्थीत होते.

जियान्ट्स वेल्फेअर फौंडेशनद्वारे गोव्यातील पणजी येथे झालेल्या पुरस्कार समारंभात जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले, यामधे प्रा.डाँ.पि.एस.रामानी (वैद्यकीय), डाॅ.प्रकाश पर्येकर (वाचनालय व शैक्षणिक) , पद्मश्री संजय अनंत पाटिल (प्रगतीशिल शेतीतज्ञ), व्हिक्टर आर वाझ (क्रिडा), संदिप परब (समाजसेवा),रूपेश गवस (व्होक्यालिस्ट) अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना यावेळी पुरस्काराद्वारे गौरविण्यात आले.

पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी बोलताना सद्यस्थीतीत ३०० निराधार बेघर वंचितांसाठी आश्रम चालविणे हे आत्यंतिक खर्चाचे आणि आव्हानात्मक काम आहे. त्यादृष्टीने जनतेने या कामाला सहाय्य करावे असे आवाहन संदिप परब यांनी केले.कार्यक्रम स्थळी उपस्थीत जियान्ट्सृ वेल्फेअर फौंडेशनचे पदाधिकारी, जियान्ट्स व सहेली यांनी सभागृह भरगच्च भरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!