सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायती ही विकासाची मोठी केंद्रे ठरणार आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील समर्थ भारत आत्मनिर्भर भारत हा ग्रामविकासाच्या मार्गाने समृद्ध होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि येणारा अमृत काल यांच्या संगमावर आज भारत देश नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने विकासाची झेप घेत आहे. म्हणुनच ग्राम पंचायत सक्षम होणे ही काळाची गरज आहे. या ग्राम विकासाला सरपंच दिशा देत असतो. या सरपंचांना जर योग्य ते प्रशिक्षण दिले. त्यांना विकासाची Vision दिली तर एक विलक्षण सकारत्मक बदल घडून येईल या भूमिकेतून आमदार नितेश राणे यांनी कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील निवडक सरपंचांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर, जि. ठाणे येथे निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 6 व 7 फेब्रुवारी या काळात हे विशेष शिबीर म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर, जि. ठाणे येथे संपन्न होणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर निवडक 21 सरपंचांना पाठविणार असून पुढील टप्प्यात इतर सरपंचांचे प्रशिक्षण पार पडेल.सरपंचांना कर्तव्ये अधिकार योजना निधी कार्यपद्धती ग्रामसभा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राज्यातील एक नामवंत आणि दर्जेदार प्रशिक्षण संस्था आहे. अशा दर्जेदार संस्थेत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी नव निर्वाचित सरपंचांना मिळणार असून त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला निश्चित पणे होणार आहे.












