समाजकल्याण अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मागे असलेला मास्टर माईंड शोधणार
कणकवली (प्रतिनिधी) : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराबाबत सामाजिक एक एकता मंच सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली येथे मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाच्या अनुषंगाने प्रातांधिकारी कणकवली यांच्या मध्यस्थीने समाजकल्याण आयुक्त सिंधुदुर्ग यांनी सभा दिनांक 7 व दिनांक 9 अशा दोन तारखांना सभा आयोजित केली मात्र सदर सभांना गटविकास अधिकारी आणि समाज कल्याण आयुक्त अनुपस्थित राहिले . त्याचा सामाजिक एकता मंचच्या कोअर कमिटीने निषेध केला . तद्नंतर सभा सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव यांनी सुरू केली .
सदर वेळी सर्व गावांमध्ये बेंचेस पोहोच आहेत का ? असा प्रश्न समाजभुषण संदीप कदम यांनी विचारला असता 250 पैकी 198 गावात बेंचेस पोहच आहेत तर 52 गावांमध्ये बेंचेस पोहच नसल्याचे त्यांनी सांगितले . तेव्हा कोअर कमिटी सदस्य यांनी लेखाधिकारी यांना फैलावर घेतले व संपूर्ण निविदे ची माहिती द्या असे सांगितले त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली .दिनांक 13.2.2024 रोजी टेंडर लावण्यात आले दिनांक 23 . 2 . 2024 रोजी टेंडर उघडण्यात आले दिनांक 27 . 2 . 2024 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आणि दिनांक 04 .03 . 2024 रोजी ठेकेदाराला पेमेंट करण्यात आले मात्र बेंचची मागणी ही टेंडर लावल्यानंतर ची आहे आणि बेंचेसचे वितरण हे जून नंतर करण्यात आले आहे म्हणजे टेंडर बिल अदा केल्यानंतर बेंचेस वितरण व ग्रामपंचायतची पोहच घेतलेली आहे . अशाच पद्धतीने सोलर लॅम्प सुद्धा बेंचेस तारखां प्रमाणेच त्याच तारखांना मंजूर केलेले आहे .एकाच वेळेला दोन टेंडर घाई गडबडीत मंजूर करून फार मोठा भ्रष्टाचार समाजकल्याण च्या निधीत करण्यात आला आहे . त्याचप्रमाणे जिम साहित्य वाटप यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे एकूण 41 गावांमध्ये जिम बसवण्यात आल्या एका जिमची किंमत नऊ लाख 70 हजार रुपये लावण्यात आली आहे . तिन्ही योजनां च्या कागदपत्रांच्या झेरॉक्स यावेळी घेण्यात आल्या . त्या कागद पत्रावरून समाज कल्याण विभागाच्या एकूण दहा कोटी निधी चा बेकायदेशीरपणे वापर करून पैशांचा अपव्यय केला असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे .याबाबतीत उपस्थित सामाजिक एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली . सदर टेंडर बील मंजुर टिपणी मागितली असता सदर टिपण्यांवर एका दिवशी सर्व अधिकाऱ्यांनी मंजुरीबाबत टिपण्या मारून तात्काळ संपूर्ण रक्कमेचा चेक दिला आहे . या बाबतही टिपण्यांच्या झेरॉक्स प्रती घेण्यात आल्या .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज कल्याण विभागाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला आहे .स्थानिक ग्रामपंचायत सदस्य , लोकप्रतिनिधी , तसेच वाड्या वस्त्या मधील प्रमुख कार्यकर्ते यांची मागणी नसताना अगर त्यांना कोणतीही कल्पणा दिलेली नाही . फक्त अपहार करण्यासाठीच डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास योजना राबविण्यात आली आहे . असा आरोप सामाजिक एकता मंचच्या कोअर कमिटीने केला आहे . येत्या 28 ऑक्टोबर पर्यंत सर्व संबंधित बेंचेस , जिम साहित्य आणि सोलर लॅम्प यांची ग्रामपंचायत स्टॉक रजिस्टर ला नोंद असल्या ची माहिती आम्हाला द्यावी तसेच जिओ टॅगचे फोटो उपलब्ध करून द्यावेत सर्व बेंचेसवर ऑइलपेंट कलरने योजनेचे नाव टाकावे तसेच सदर बेंचेस , जिम साहित्य आणि सोलर लॅम्प यांची किंमत अवाजवी असल्याने त्या संदर्भात पुर्नमुल्यांकन करावे नी तसा अहवाल सामाजिक एकता मंचला द्यावा असे सांगण्यात आले अन्यथा बेंचेस , जिम साहित्य , सोलर लॅम्प प्रकरणी समाजकल्याण सचिव यांच्याकडे लेखी तक्रार देवुन पोलिस स्टेशनला समाज कल्याण आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या विरोधात कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन घेवून तक्रार देणार असल्याचे सामाजिक एकता मंचच्या वतीने अंकुश कदम यांनी सांगितले .
सदर वेळी सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गचे सचिव समाजभुषण संदीप कदम , कणकवली बौद्ध विकास संघ अध्यक्ष अंकुश कदम , रोहीदास समाज राज्याध्यक्ष संजय (छोटू ) कदम , चर्मकास समाज जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण , सिद्धार्थ तांबे हेमंत कुमार तांबे , प्रकाश वाघेरकर , सरपंच दिपक कदम ,माजी सरपंच प्रविण कदम , माजी सरपंच सुभाष कांबळे , कणकवली बौद्धमहाल संघाचे माजी अध्यक्ष डी डी कदम ,माजी सरपंच रवी शिंगे , राहुल तांबे ,संजय तांबे ,रावजी यादव व सामाजिक एकता मंचचे प्रमुख कायकर्ते उपस्थित होते .