कनेडी (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत कनेडी बाजारपेठेत मतदान जनजागृती रॅली व पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
मतदान प्रचार आणि प्रसार व निवडणूक साक्षरता या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी व उत्कृष्ट पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
या मतदान जनजागृती मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अमूल्य मता संदर्भात घोषणा व दर्जेदार प्रकारे पथनाट्य सादरीकरण केले. या अभियानामध्ये सांगवे गावचे सरपंच संजय सावंत, उपसरपंच अभिजीत काणेकर,सांगवे गावचे पोलिस पाटील दामोदर सावंत,ग्रामसेवक संतोष कविटकर,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कांबळे, दिपक नांदगावकर सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मतदान जनजागृती करणारे विद्यार्थी, पथनाट्य सादरीकरण करणारे विद्यार्थी बाजारातील व्यापारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.