भाजप नेते,माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास
सिंधुदुर्गातील तिन्ही मतदरसंघातून महायुतीचे तिन्ही उमदेवार निवडून आणणारच ..!
कणकवली (प्रतिनिधी) : ५० हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणारआहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे. कणकवलीतून नितेश राणे कुडाळ मधून निलेश राणे आणि सावंतवाडीतून दीपक केसरकर यांना निवडून आणणारच असा विश्वास माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.ते कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन बोलत होते.यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादी कार्याध्यक्ष काका कुडाळकर,संजय आग्रे,आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष अजित कदम,रणजित देसाई,राजू राऊळ,रुपेश पावसकर,आर.के. सावंत,संजय भोगटे,निता राणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











