देवगड (प्रतिनिधी) : पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील, यांच्यासह अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे
उबाठा सेनेचे पदाधिकारी हे केवळ निवडणुकीपुरतीच येतात विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रवेश करणाऱ्या व्यक्तींमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव,वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत छाया पवार,रोहन राणे,प्रतिभा पाटील यांचा समावेश आहे
यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, राजू शेट्टे सदा ओगले, संदीप साटम, सावी लोके आदी उपस्थित होते