आ. नितेश राणे यांनी केली मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : देवगड गिर्ये येथील प्रस्तावित मत्स्य महाविद्यालय उभारणी व पदभरती डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे अधिपत्याखाली केली जावी.मत्स्य विद्याशाखा रत्नागिरी यांचेशी ते सलग्न केले जावे अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जि. रत्नागिरी हे कोकणातील ७ जिल्ह्यातील जनतेचे तसेच मच्छिमारांचे प्रतिनिधीत्व करते. कोकण प्रदेशातील तरूणांना या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत ७० टक्के आरक्षण मिळत आहे. त्याचप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ आणि मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी यांनी संपूर्ण कोकणातील मत्स्य शिक्षण, संशोधन आणि विस्तार ,शिक्षणाच्या गरजा अविरतपणे पूर्ण करीत आहेत. त्यामुळेच देवगड गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालय हे मत्स्य विद्याशाखा रत्नागिरी यांचेशी सलग्न करून कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत उभारणी व पदभरती ही कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत करण्यात यावी