कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगांवकर यांचा इशारा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : संपातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावा अगर कितीही कठोर कारवाई करा आता संपातून माघार नाही,आता आर या पार ची लढाई हा एकमेव मार्ग उरला आहे. असे समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगांवकर यांनी आंदोलना दरम्यान परखड भूमिका घेतली आहे.
जुन्या पेन्शन साठी १४ मार्च पासून सुरु असलेल्या संपातील काही संपकऱ्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.शासन संपकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहे.परंतु अशा कितीही नोटिसा बजावल्या अगर कितीही मोठी कठोर कारवाई केली तरी आमचे कर्मचारी या कारवाईला भीक घालणार नाहीत.उलटपक्षी मोठ्या जोमाने या संपात सहभागी होतील.संप कमालीचा यशस्वी होत असल्याने शासन बिथरले असून येनकेन प्रकारे संप मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. आमचे कर्मचारी जुनी पेन्शन मिळविण्याच्या मागणीवर ठाम असून कितीही कारवाईचे बडगे उगारलात तरी आता संपातून कोणीही कर्मचारी माघार घेणार नाही,कोणीही बिथरणार नाही.आता आर या पार ची लढाई करू असा इशारा राज्य सरकारी,निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन कोरगांवकर यांनी दिला आहे.
आज संपाच्या चौथ्या दिवशी मोठ्या संखेने कर्मचारी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यलया समोर धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. यामध्ये दिवसेंदीवस कर्मचऱ्यांची संख्या वाढत आहे. शासनाने कितीही दबाव निर्माण केला तरी कर्मचऱ्यांची एकजुट हा दबाव हानून पाडेल. असा इशारा यावेळी आंदोलनात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाला दिला आहे.