कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनात भर पाडणारा बारमाही वाहणाऱ्या कृत्रिम धबधब्याचे भूमिपूजन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले. अडीच कोटी निधी खर्च असणार्याव्ह धबधबा चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती सान्याजवळ बांधण्यात येणार आहे. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडें, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या भूमिपूजन प्रसंगी बांधकाम सभापती विराज भोसले, नगरसेवक अभि मुसळे, मेघा गांगण, बाबू गायकवाड, मेघा सावंत, कविता राणे, शिशिर परुळेकर,प्रतीक्षा सावंत माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, रोटरी क्लब अध्यक्ष वर्षा बांदेकर, महेश सावन्त, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, राजश्री धुमाळे आदी उपस्थित होते.