ग्रा.पं.सदस्या सारिका कुडाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुरंगावणे गावामध्ये घेतला प्रवेश
नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्वल भवितव्य
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभगातील कुरंगवणे या गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेना पक्षाला चांगलाच दणका दिला असून उबाठाचे ग्रामपंचायत सदस्या सारिका कुडाळकर यांच्यासह अनेक शेकडो सेना कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला असून भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित कुरंगवणे कुडाळकरवाडी येथे हा प्रवेश संपंन झाला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे उपसरपंच बबलू पवार, शक्ती केंद्र प्रमुख राजा जाधव आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर भाजप पक्षात प्रवेश केलेले ऊबाठा पक्षाचे कार्यकर्ते पुढील प्रमाणे बाबू गोठणकर, चंद्रकांत कुडाळकर,अरुण नरम, मोतीराम भितम, गणपत कुडाळकर, पांडुरंग कुडाळकर, सुप्रिया कुडाळकर, आकाराम रायकर, संजय कुडाळकर संतोष कुडाळकर, सूर्यकांत कुडाळकर, संतोष पाष्टे, दीपक भितम, अभिजीत भितम, शंकर मांडवकर, गणपत भितम, दीपक कुडाळकर, सदाशिव कुडाळकर, रवींद्र नराम, अर्जुन कुडाळकर, मनोहर कुडाळकर, एकनाथ गोठणकर आदी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिपणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्वल भवितव्य आहे असे मत उबाठा सेनेचे पक्ष प्रवेशकरते कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.तर भाजप पक्षात प्रवेश केलेल्या सर्व उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले.