कणकवली तहसीलदार कार्यालयात १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान टपाली मतदानाची सुविधा

कणकवली (प्रतिनिधी) : मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांजकडील अधिसूचना क्र. ECI/PN/148/2024 दि. १५.१०.२०२४ मध्ये नमुद केलेप्रमाणे दि. १५.१०.२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची अधिसुचना प्रसिध्द झालेली आहे. सदर अधिसुचनाप्रमाणे सार्वत्रिक विधानसभा निवडणुक दि. २०.११.२०२४ रोजी घेण्यात येणार आहे. परंतु मतदान केंद्रावर कर्तव्यार्थ नेमलेले मतदान केंद्रावरील शिक्षक/अधिकारी/कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना मतदानाचा हक्क बजाविता येणे आवश्यक आहे. यासाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार तहसिलदार कार्यालय कणकवली येथे दि. १७.११.२०२४ ते दि. १९.११.२०२४ या कालावधीत टपाली मतदान केंद्र सुविधा कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. तरी दि. १७.११.२०२४ ते दि. १९.११.२०२४ या कालावधीत स. १०.०० ते सायं. ०५.०० या वेळेत मतदान केंद्रावर कर्तव्यार्थ नेमलेले मतदान केंद्रावरील शिक्षक/अधिकारी/कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना मतदानाचा हक्क बजाविता येईल.

error: Content is protected !!