फेकू आमदार नितेश राणेंच्या भूलथापांना बळी पडू नका

मुस्लिमांविरोधात नितेश राणेंनी भाजपाकडून कॉन्ट्रॅक्ट घेतले ?

मुस्लिम बांधव माझ्यासोबत असून मलाच मतदान करतील

अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी भाजपा उमेदवार नितेश राणेंना केले टार्गेट

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसमधून 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार नितेश राणे हे मागील दोन वर्षांत मुस्लिम धर्मियांबाबत चिथावणीखोर स्टेटमेंट देत आहेत. भाजपचे 104 आमदार राज्यात असताना नीतेश राणे एकटेच मुस्लिमांवर का बोलत आहेत. भाजपाने नीतेश राणेंना मुस्लिम बांधवांना टार्गेट करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का ? फेकू आमदार नितेश राणेंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन सबका साथ सबका विकास हे सूत्र समजून घ्यावे आणि नंतर आपले तोंड उघडावे. मुस्लिमांवर बोलून जर आमदार मंत्री आणि पालकमंत्री होण्याचे स्वप्न जरी नीतेश राणे बघत असतील तरी माझा मुस्लिम समाज हा माझ्यापाठीशी आहे. आमचे मुस्लिम बांधव जरी नितेश राणेंसोबत प्रचारात फिरत असले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधव हे सुरुवातीपासून माझ्या बाजूने आहेत. माझ्या मुस्लिम बांधवांना मी आवाहन करतो की ह्या निवडणूकीत सर्व मुस्लिम बांधवांनी माझ्य सोबत राहावे. आणि फेकू आमदार नितेश राणेंना धडा शिकवावा असे आवाहन अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी मुस्लिम समाजातील मतदारांना केले. मागील 10 वर्षांत आमदार नितेश राणे यांनी केवळ फसवेगिरी केली आहे. काँग्रेस मधून भाजपात जाताना आमच्या मुस्लिम बांधवांकडे साथ देण्याची विनंती केली. मात्र हळूहळू नीतेश राणेंनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. प्रचाराला दोन दिवस शिल्लक असून कणकवली विधानसभा मतदारसंघात मला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला आहे. कणकवली एसटी स्टँडवर फातिमा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याबाबत एसटी चे चालक वाहक यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांना निलंबित करावे अशी आग्रही मागणी मी एसटी विभाग नियंत्रकांकडे केली आहे. फातिमा यांच्या कुटुंबियांना एसटी कडून तात्काळ 5 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. यावेळी नासिर शेख, आरिफ काझी, सोहेल चौगुले, आदिल चौगुले, आरिफ शेख आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!