खारेपाटण मधील मुस्लिम भगिनीचा शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश

संदेश भाई पारकर यांच्या उपस्थित केला जाहीर प्रवेश

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा पक्षाचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील मुस्लिम महिला भगिणीनी आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी शिवसेना उबाठा पक्षात मशाल हाती घेऊन जाहीर प्रवेश केला.

खारेपाटण येथील शिवसेना शाखा कार्यालयात संपन्न झालेल्या या जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमात खारेपाटण येथील मुस्लिम समाजाच्या भगिनी तैसिम अश्रफ मुकादम,रुबिना फिरोज काझी, यास्मिन एजाज मुकादम, फरझाना अब्दुलवहाब मुकादम,आफरिन नदीम काझी,शैनाज वसीम मुकादम, मुझेना इम्रान मुकादम,यांसह आश्रफ हुसेन मुकादम यांनी शिवसेना उबाठा पक्षात आज जाहीर प्रवेश केला.सर्व पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांचे संदेश पारकर यांनी शिवसेना पक्षाची शाल गळ्यात घालून तर हातात मशाल चिन्ह देऊन स्वागत केले.

यावेळी शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,खारेपाटण विभाग संपर्क प्रमुख सतीश गुरव,युवासेनेचे कार्यकर्ते तेजस राऊत, महिला विभाग प्रमुख अंजली पांचाळ, निखिल गुरव,संघटक दया कुडतरकर,खारेपाटण विभाग प्रमुख बाळा राऊत,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर वळंजू,सुनील कर्ले,सुधीर गांधी आदी प्रमुख पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण मध्ये शिवसेना उबाठा पक्षात मुस्लिम महिला भगिणीनी प्रवेश केल्यामुळे पक्ष संघटनेला यामुळे बळकटी मिळणार असून आता या विधानसभा मतदार संघात परिवर्तन हे अटळ आहे.असे सूचक विधान यावेळी संदेश पारकर यांनी केले.

error: Content is protected !!