ओरोस (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सपत्नीक रानबांबुळी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी आज एकाच दिवशी 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन सावंत यांनी केले.