आता कणकवलीतही विद्युत शव वाहिनीवर होणार मृतदेह दहन

नगरपंचायत च्या विद्युत मृतदेह शव वाहिनीवर करण्यात आला मृतदेह दहन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतने विदयुत शव दाहिनी मिळावी अशी मागणी केली होती.. कारण कोरोना कालावधीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विदयुत शवदाहिनी दिल्या होत्या. कणकवली नगरपंचायत स्मशानूमीतील या विद्युत शव दाहीनीवर काल (गुरुवारी) पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार यशस्वीपणे करण्यात आते. त्यातून अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे पानी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अभिजीत मुसळे उपस्थित होते.या मृतदेहाचे शव दहन आम्ही मोबाईल द्वारे चित्रीकरण केले आहे. या दहन प्रक्रियेता २ फुटाचे लाकडाचे तुकडे लागतात, फक्त २० टक्के लाकडे लागतात. अवघ्या दोन तासात मृतदेह दहन प्रक्रिया पूर्ण होते. दहन होत असताना धूर हा प्रक्रिया होऊन बाहेर जातो. त्यामुळे प्रदूषण न होता पर्यावरण रक्षण होते.

मृतदेह जाळल्यानंतर राख देखील अल्प प्रमाणात असते. मृतदेहाची राख होत नाही फक्त कपडे असतात, त्याची राख असते मृतदेहाचे पुरेसे अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात हिंदू धर्मातीत सर्व विधी करता येतात. त्यामुळे मृतदेह दहनासाठी विदयुत दाहिनीचा वापर करावा, निसर्ग वाचविण्यासाठी नगरपंचायतीला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात पहिला मृतदेह कणकवलीत विदयुत दाहिनीत दहन करणे यशस्वी झाले असल्याने नागरिकानी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!