नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

मुंबईतील देवगिरी निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधीं) : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची आज मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदी नाव जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडूलकर, गणेश चौगुले, अनिकेत नाईक उपस्थित होते. अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा सलग इतिहास रचला असून त्यांना या ऐतिहासिक कामगिरीच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!