खारेपाटण चेकपोस्ट येथे अवैध रित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

गावठी गाय वासरे अशी मिळून सुमारे १९ जनावरांचा समावेश

खारेपाटण (प्रतिनिधीं) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आज गुरवारी पहाटे ६.३० च्या दरम्यान खारेपाटण चेक पोलिसांनी अवैध्यरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. सदर गुरे वाहून नेणारा ट्रक हा गुरांची कत्तल करण्यासाठी नेत असल्याचा संशय असल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की. सावंतवाडी वरून आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा ट्रक वाहन क्रमांक – के ए २५ बी १५०५ हा खारेपाटण चेक पोस्ट येथे सकाळी ६.३० वाजता आला असता खारेपाटण चेक पोस्ट ला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना सदर वाहनाचा संशय आल्याने वाहन तपासले असता सदर वाहनात गावठी गायी व वासरे अशी मिळून सुमारे १९ पाळीव जनावरे आढळून आल्याने सदर वाहनातून अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सबंधित वाहनचालक आदम अली इसफ नेत्रिकर राहणार आजरा, कोल्हापूर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात पोलिसाना यश आले आहे. तर गाडीचा क्लिनर फरार असल्याचे समजते. दरम्यान अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सबंधित वाहनचालकांवर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर वाहनचालकांवर या पूर्वी देखील अवैध रित्या गुरे वाहतूक करतानाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. तर अवैध रित्या गुरांची वाहतूक करत असल्याची माहिती काही प्राणी मित्र व पोलिसाना समजताच सदर वाहनाचा पाठलाग करण्यात आला. सदर वाहन आजरा येथे गुरे घेऊन जात असल्याचे समजले. मात्र आपल्या वाहनाची पाठलाग चालू असल्याचे निदर्शनास येताच वाहन चालकाने आपला मार्ग बदलून खारेपाटण मार्गे येताच खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी मोठीं कारवाई करत मुक्या गुरांना जीवनदान देण्याचे काम केले. याबद्दल पोलिसांचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे पोलीस अधिकारी माने, मोहिते करत असून घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मुंडे हे देखील घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

error: Content is protected !!