ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून, नगराध्यक्षांची फुकटची पोपटपंची-सुशांत नाईक*

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याच्या थापा मारून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे यांच्या हल्लाबोल इशाऱ्याला कवडीची किंमत दिली नाही. यावर पडदा टाकण्यासाठीच पॅचवर्क स्वखर्चाने केल्याचे नलावडे भासवत आहेत असा टोला शिवसेना गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी लगावला आहे.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर चौकातील रस्त्याचे पॅचवर्क झाले नव्हते. सध्या कणकवली शहरात रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू आहेत या रस्त्यांचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराकडून छ.शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क पूर्ण करून घेण्यात आले आहे. मात्र नगराध्यक्ष जणू काही स्वखर्चाने पॅचवर्क केल्याचे भासवून फुकाचे श्रेय घेत आहेत.गेले काही महिने सदरचा पॅचवर्क न झाल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला अनेक अपघात झाले हे कणकवलीच्या जनतेला ज्ञात आहे. जर नलावडे यांना पॅचवर्क स्वखर्चाने करायचा होता तर एवढे दिवस कोणाची वाट बघत होते. आता दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदाराने नलावडे यांच्या हल्लाबोल ईशाऱ्याला कवडीची किंमत न दिल्याने त्यावर पडदा टाकण्यासाठीच ठेकेदाराच्या खिशातून झालेले पॅचवर्कचे काम स्वखर्चाने केल्याचा सांगून त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!