हाफ मर्डर च्या गुन्ह्यात लक्ष्मण नाईक, परशुराम नाईक ला 5 वर्ष कारावास सह 60 हजार चा दंड

सरकारी वकील गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधीं) : शेतीच्या वादातून धारदार हत्याराने रुपेश पाटील याच्यावर हल्ला करून ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी लक्ष्मण मधुकर नाईक व परशुराम मधुकर नाईक रा. गावडेवाडी आकेरी या बंधूंना जिल्हा न्यायालयाने 5 वर्ष कारावास सह 60 हजार रोख दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

आरोपी लक्ष्मण मधुकर नाईक व परशुराम मधुकर नाईक रा. गावडेवाडी आकेरी यांनी शेतीच्या वादातून रुपेश कृष्णाजी पाटील याला कांमळेवीर येथील बाजारपेठेत गाठून धार धार लोखंडी हत्याराने डोक्यावर चार वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 161/2019( सेशन केस नंबर 55/ 2019) भा. द. वि कलम 307, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व आर टी हुलावळे यांनी केला होता. सदर खटण्यात सरकार तर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी 12 साक्षीदार तपासले होते. वरिष्ठ न्यायालयांच्या निवाड्यांचा आधार घेत त्यांनी युक्तिवाद देखील केला होता. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी आज दोन्ही आरोपींना भा द वि कलम 307, 504, 506 सह 34 अन्वये दोषी धरून भादवि कलम 307 मध्ये पाच वर्ष सश्रम करावास व रुपये 15 हजार दंड प्रत्येकी, भादवी कलम 504 करिता सहा महिने सश्रम करावास व पाच हजार दंड प्रत्येकी, तसेच भादवि कलम 506 करिता दोन वर्ष सश्रम करावास दहा हजार दंड प्रत्येकी ( एकूण दंड 60 हजार रुपये ) त्यामधील रुपये 40 हजार फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून द्यावयाचे आहेत. अशी शिक्षा सुनावली. केसच्या सुनावणीवेळी पैरवी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, कॉन्स्टेबल अनिता कोळी व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!