पाझर फुटूद्या आपणांस माणुसकीचा….लावूया हातभार सर्वांनी मदतीचा….

चिमुकल्या कु.काव्या शेळकेसाठी मदतीचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील, परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणारे आचरा गावचे रहिवासी श्री चंद्रशेखर बाबुराव शेळके यांची अवघ्या तीन वर्षाची चिमुरडी कु. काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाले. आपल्या चिमुकल्या मुलीला ब्लड कॅन्सर झाल्याचे ऐकून शेळके कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. सध्या काव्यावर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांबूळी गोवा येथे उपचार सुरु आहेत. पुढील सात ते आठ महिने गोवा येथे थांबून उपचार घेण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय डॉक्टरांनी दिला आहे. शेळके यांचं तेथे कोणी नसल्यामुळे भाड्याचा रूम घेऊन राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

चंद्रशेखर शेळके हे हे मोलमजुरी करून कुटुंब चालवत असल्याने सर्व कुटुंब हे त्यांच्यावर अवलंबून होते. अशा वेळी मुलीवर ओढवलेल्या प्रसंगामुळे पूर्णतः कोलमडून गेले आहेत. काव्यावर उपचार हे हॉस्पिटलकडून होणार असले तरी हॉस्पिटल बाहेरील लागणारी महागडी इंजेक्शन, गोळ्या, औषधे हे त्यांच्या आवाक्याबाहेरील आहेत.

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या चंद्रशेखर शेळके यांच्या मुलीवर ओढवलेला प्रसंग, आणि आपल्या लाडक्या लेकीसाठी होत असलेली बापाची घालमेल खरंच मन हेलावणारी आहे.

गरज आहे ती दानशूर व्यक्ती ,संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून कु. काव्या शेळके या मुलीच्या उपचारासाठी, या आजारातून लवकरात लवकर बरी होण्यासाठी माणुसकीच्या नात्याने आपल्याला जमेल तसा हातभार लावावा असे आपणास आवाहन करण्यात यावे असे आवाहन
करण्यात आले आहे.

मदत खाली दिलेल्या बँक खाते किंवा गुगल पे क्रमांकावर पाठवावी.
बँक तपशील
चंद्रशेखर बाबुराव शेळके
बँकेचे नाव :-बँक ऑफ इंडिया
शशाखा :-आचरा ,आय एफ एस सी कोड :-BKID0001472
खाते क्रमांक :- 147210110005241
गुगल पे क्रमांक
चंद्रशेखर शेळके – 9420822659
या नंबर मदत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!