4 लाख 20 हजारांच्या अवैध दारुसह 12 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली चेक पोस्ट पथकाची कौतुकास्पद कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : एक्साईज इन्सुली तपासणी नाका यांच्या पथकाने 4 लाख 20 हजार 840 रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह आलिशान क्रेटा कार असा एकूण 16 लाख 20 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुना पत्रादेवी बांदा रोड पंजाबी फॅमिली धाब्याजवळ बांदा येथे ही कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 5 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी केली. या प्रकरणी वाहनचालक शुभम शिवप्रसाद शितोळे ( वय 27, रा. सावंतवाडी ) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना पत्रादेवी बांदा रोड वर एक्साईज चे पथक वाहनांची तपासणी करत असताना क्रेटा कार क्र.MH-08-BE-0081 मध्ये गोवा बनावटीची 80 बॉक्स मध्ये अवैध दारू आढळून आली. एक्साईज सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान वाहन चालक रणजित शिंदे, जवान दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री यांनी केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.

error: Content is protected !!