भजन कलाकारांची ८ डिसेंबर रोजी कणकवलीत सहविचार बैठक

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांनी उपस्थित राहावे

कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : भजन, परंपरा जतन, विकास आणि समस्त भजन कलाकारांच्या उज्वल भवितव्यासाठी आपली वज्रमूठ आवश्यक आहे. यासाठी सर्व भजन कलाकारांनी संघटित होण्याची गरज आहे. हि बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांनी यामध्ये प्रामुख्याने बुवा, वादक, आणि कोरस यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली शहरातील मातोश्री हॉल येथे ही बैठक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ कलाकारांसहित अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!