नाईक बंधूंना नेहमीच ठेकेदारांकडून फुकट कामे करून घेण्याची सवय
कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थलांतरित केलेल्या पुतळ्याच्या जागी सर्विस रोडवर केलेले पॅकवर्क हे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले. व हे काम शिवसेनेचे पराभूत झालेले कलमठ येथील सरपंच पदाचे उमेदवार ज्यांना आमदार वैभव नाईक यांनी तिकीट दिले होते त्या ठेकेदार रामदास विखाळे यांनी केले. नाईक बंधूंना नेहमीच ठेकेदाराकडून फुकट कामे करून घ्यायची सवय असल्याने सुशांत नाईक यांना हे काम देखील फुकटच करून घेतले असे असे वाटले. ठाकरे गटाच्या या काम केलेल्या ठेकेदाराने काम नगराध्यक्षांनी स्वखर्चाने नाही तर फुकट करून घेतले असे जर जाहीर केले तर सुशांत नाईक यांचे म्हणणे आम्ही खरे मानू असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला.
सुशांत नाईक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना श्री. परुळेकर यांनी म्हटले आहे की, कणकवली नरडवे चौकीतील सनराईस टॉवर चा असेसमेंट होत नसल्याने सुशांत नाईक हर वैफल्यग्रस्त झाले आहेत. या टॉवरचे साईट मार्जिन सुटले नसून अतिरिक्त बांधकाम केल्याने हा संपूर्ण टॉवर अनधिकृत ठरला असल्याचेही श्री परुळेकर यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाला सातत्याने विरोध करण्याचे काम सुशांत नाईक यांनी केले. त्यांच्या सत्तेच्या काळात ते जी कामे करू शकले नाहीत ती कामे आम्ही धडाका लावत पूर्ण केल्याने सुशांत नाईक यांना धडकी भरली आहे छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाला विरोध केल्यानंतर आता येथील पॅचवर्कला देखील हे विरोध करणार हे आम्हाला माहीत होतं. व अखेर तेच झालं. कणकवली शहरात नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विकासाचा जो धडाका लावला गेला या धडाक्या मुळेच सुशांत नाईकांना धडकी भरली असून यावेळी दुसऱ्याला कुणाला तरी पुढे करण्यापेक्षा सुशांत नाईक यांनी स्वतःच नगराध्यक्ष पदाकरिता उभे राहावे असे आव्हान देखील श्री. परुळेकर यांनी दिले आहे. तसेच सनराईस टॉवरच्या बांधकामाची चौकशी करा. अन्यथा आम्ही सर्व नगरसेवक या अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा देखील श्री परुळेकर यांनी दिला आहे.