वैभववाडी परिसरात जागतिक पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्वतासह पर्यावरण महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आणि ती सर्वांची जबाबदारी आहे असे मत सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात जागतिक पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील उपस्थित होते.दिनांक ११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या पुढाकाराने आणि वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभाग, एनएसएस विभाग, वैभव निसर्ग मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी यांच्या सहकार्याने जागतिक पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी डॉ. एम. आय. कुभार, डॉ.एन.व्ही गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव तथा इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एन.पाटील, सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक विद्या जाधव, श्रद्धा दांडगे, अंकित काशीद, वनमजूर तात्या ढवण, प्रा.आर. बी. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. आर. एम. गुलदे, प्रा.ए.आर. दिघे, प्रा.एस.आर.राजे, प्रा.व्ही.व्ही.शिंदे, डॉ.व्ही.ए.पैठणे व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. एस.एन.पाटील यांनी मांडले.