चौके (प्रतिनिधी) : सोमवार दिनांक ४ मे रोजी श्री जरीमरी माता मित्रमंडळ (ग्रामस्थ) माळगाव बाळोजीची वाडी यांनी लघुअभिषेक व श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते ११ वा.लघुअभिषेक, दु.१२ ते १ वा. आरती, दु. १ ते २ महाप्रसाद, सायं. ४ ते ६ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ७ ते ८ वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री ८.३० ते १० वा. महाप्रसाद, रात्री ८ ते १० वा. सुस्वर भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व भाविकांनी महाप्रसादाचा व सायंकाळी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जरीमरी माता मित्रमंडळ (ग्रामस्थ) माळगाव बाळोजीची वाडी यांनी केले आहे.
माळगाव बाळोजीची वाडी येथे लघुअभिषेक व श्री सत्यनारायण महापूजा












