सायली घाडी यांना परत पिग्मी एजेंट म्हणून घ्या – खातेधारकांनी दिले बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन
देवगड (प्रतिनिधी) : सायली शशिकांत घाडी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेचे पिग्मी एजेंट व सदाफुली ठेव योजनेचे प्रतिनिधी रद्द करण्यात आले आहे. यानंतर सायली घाडी यांच्या खातेधारकांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेच्या व्यवस्थापक यांना निवेदन देत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला इशारा दिला आहे. गेली 24 वर्षे प्रामाणिक पणे बँकेच्या हितासाठी काम करणाऱ्या महिलेला आपण विनाकारण जर कमी करत असाल तर आम्ही त्त्यांचे खातेधारक म्हणून आमच्या ठेवी काढून घेऊ असा थेट इशारा यावेळी खातेधारकांनी दिला. आमच्या कोणत्याही खातेधारकांची तक्रार नसताना देखील आपण त्यांच्यावर केलीली कारवाई योग्य नाही आपण त्यांना पिग्मी एजेंट म्हणून परत घेत नसाल तर आम्ही आपल्या बँकेत असलेली पिग्मी खाती बंद करण्याचा विचार करत आहोत, असे निवेदन खातेधारकांनी दिले.
यावेळी सायली घाडी यांचे पिग्मी खातेधारक सदानंद माणगावकर, विजय माणगावकर, अथर्व मोंडे, प्रभाकर कोयंडे, तन्मय कोयंडे, हिराकांत कोयंडे, अजय कोयंडे, प्रमोद बांदेकर, नेहा चौघुले, गणेश तावडे, उदय मोंडकर, नरेश घाडी, अजय मोंडे, वैष्णवी मोंडे, तुकाराम मुणगेकर, मनोज पोकळे, सचिन पोकळे, क्रांती पोकळे, कविता घाडी, संजय पावसकर, सागर राणे, संजय देवरुखकर, मनीषा पाटील, मयुर चव्हाण, प्रमोद राणे, मयुरी तावडे, सोनाली घाडी, राजाराम तांबे, नारायण अनुभवणे, संतोष माणगावकर, कल्याणी घाडी, स्वरा घाडी, प्रतीक्षा घाडी, प्रणाली घाडी, शरीफ गिरकर, योगेश घाडी, सुप्रिया घाडी , सत्यवान घाडी, विनायक बापट आदी खातेधारक यावेळी उपस्थित होते.