लुधियानातील राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये हिंगणघाटच्या सुकन्येचे घवघवीत यश!
तळेरे (प्रतिनिधी) : 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 पर्यंत लुधियाना( पंजाब)येथे होत असलेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये भारत विद्यालय हिंगणघाट येथील 19 वर्षे वयोगटांमध्ये -36 वजन गटात कुमारी मानसी राजेंद्र गाठे वर्ग१२ वा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले सत्र 2023 24 मध्ये याच मानसी गाठेला सुवर्णपदक प्राप्त झाले होते यावेळी सुद्धा तिने चांगले प्रयत्न केले परंतु सुवर्णपदकापासून ती वंचित राहिली तरी पण जिद्द न सोडता रौप्य पदकाला गवसणी घातली र्मिळालेल्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री गोकुलदासजी राठी सचिव रमेशराव धारकर उपाध्यक्ष श्याम भाऊ भिमनवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजूजी कारवटकर सर उपमुख्याध्यापक श्री भट्टड क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर क्रीडाशिक्षक संदीप चांभारे कु. संजना चौधरी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी तसेच वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव सेन्साई प्रकाश पवार जीवन कांमडी योगेश देवगिरकर गौरव कामडी तिलक राणे यांनी मिळालेल्या यशाबद्दल कु. मानसी गाठे चे अभिनंदन व कौतुक केले आहे