मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचे संतोष कानडेंचे भले मोठे हटके कट आउट ठरताहेत लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी) : आपले लाडके आमदार नितेश राणे कॅबिनेट मंत्री होताच कार्यकर्त्यानी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले. पण यामध्ये राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी उभारलेले 25 फुट उंचीचे हटके कट आऊटस सर्वात लक्षवेधी ठरत आहेत. सिंधुदुर्ग च्या इतिहासात अशा प्रकारे 25 फुटी कट आउट प्रथमच झळकले आहेत. गळ्यात भगवाधारी शाल, हिंदुत्वाचा ज्वलंत पुकार ठरलेले हिंदूंचा गब्बर नेता नितेश राणे यांचा पूर्णाकृती फोटो आणि त्याखाली भाजपाच्या कमळ निशाणीसह विधिमंडळ चा फोटो आणि त्यावरील हार्दिक अभिनंदन मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब असा मजकूर असलेले भले मोठे कट आउट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कणकवली शहरात संतोष कानडे यांनी हे भले मोठे कट आउट लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!