नागपूर मध्ये भेट घेत दिल्या शुभेच्छा
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, त्यांचे सुपुत्र सिद्धेश रावराणे, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी नागपूर येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत विशेष अभिनंदन केले. नितेश राणे यांच्या विजयात वैभववाडी तालुक्यातून मोठे लीड मिळविण्यात दिलीप रावराणे यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्यामुळे आमदार नितेश राणेंकडून आता वैभववाडी तालुक्यातील प्रलंबित विकासकामे अधिक जोमाने मार्गी लागतील. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा नवा प्रारंभ आता सुरू झाला आहे अशी प्रतिक्रिया दिलीप रावराणे यांनी व्यक्त केली. यावेळी वैभववाडी पं स चे माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, वैभववाडी नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष संजय सावंत, अमित साटम आदी उपस्थित होते.