चारवाडी चषक २०२६ पर्व पाचवे डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : चारवाडी चषक २०२६ पर्व पाचवे डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गावठण आळी संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 20,001 व आकर्षक चषकाचे ते मानकरी ठरले. तसेच महादेववाडी ट्रायकर्स संघाने द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक पटकावले. याशिवाय सामनावीर आणि मालिकावीर शशांक उत्कृष्ट फलंदाज – ओम नारकर उत्कृष्ट गोलंदाज -विलास धावडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – मनोज सरवणकर यांनी वैयक्तिक पारितोषिके पटकावली. हि स्पर्धा यशस्वी पाडण्यासाठी सचिन गुरव, जनार्दन टक्के, अविनाश गुरव, अनिकेत पेडणेकर आणि दशरथ बाणे यांनी तसेच समस्त चारवाडीकरांनी भरपूर मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी पार पडली. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला ते सर्व देणगीदार, वर्गणीदार सभासद यांचे आयोजकांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!