वैभववाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडिओ काढणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन नेर्ले ग्रामस्थांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना दिले आहे. नेर्ले येथील मयूर मनोहर सुर्वे, ओंकार पंढरीनाथ सुर्वे तसेच राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील पंकज पवार या तिन नराधमानी एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लीश व्हिडीओ काढले. व ते व्हायरल केले.
हे अमानुष कृत्य करणाऱ्या सदर आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेत पीडित तरुणीला शारीरिक व मानसिक झालेला त्रास न सहन होणार आहे. तिच्यावर झालेला अन्याय कधीही भरून न येणार आहे. समाजात काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. त्या तरुणांवर कठोर कारवाई व्हावी व त्या तरुणीला न्याय मिळावा.
या तरुणांकडून नेर्ले गावातील महिलांना ही त्रास होऊ शकतो. तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी ग्रामस्थ स्वप्नील खानविलकर, विश्वास पाटील, जगन्नाथ पाटील, दीपक पाटील, अक्षय खानविलकर, चंद्रकांत पाटील, रवींद्र खांडेकर, आकाश पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.












