वैभववाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नेर्ले येथील मयुर मनोहर सुर्वे, ओंकार पंढरीनाथ सुर्वे (ता. वैभववाडी) आणि – पंकज पवार (ताम्हाणे बौद्धवाडी, ता. राजापूर) या तिघांनी जिल्ह्याबाहेरील एका अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, अत्याचाराचे चित्रण असलेला व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी त्या युवतीने सोमवारी ती राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. सोमवारी दिवसभर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक नयोनी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली व तिन्ही संशयितांना अटक केली. दरम्यान, आज त्या तिन्ही संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत
युवतीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी












