मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला खारेपाटण येथे “स्वरसाधना” संगीत कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : नूतन संवस्तर स्वागतानिमित संतोष रानडे व सौ दीपा रानडे राहणार नवीन रामेश्वर नगर,खारेपाटण या कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मराठी नव वर्षाच्या शुभारंभप्रसंगी व गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला आज बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी “स्वरसाधना” हा संगीत व गायनाचा कार्यक्रम रात्री ठीक ९.०० वाजता नवीन रामेश्वर नगर,कोर्ले रस्ता खारेपाटण येथे ‘संतोष रानडे सदन’ येथे सादर होणार असून या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रानडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

खारेपाटण येथे संतोष रानडे कुटुंबियांच्या वतीने सलग १७ वर्षे मराठी नव वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम घेतला जात असून आज सादर होणार “स्वरसाधना” हा १८ वा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमासाठी मुग्धा गावकर या गोवा येथून सहकलाकारांसह आपला गायनाचा कार्यक्रम सादर करणार असून या कार्यक्रमाचे सुंदर असे निवेदन निबंध कानिटकर (संगमेश्वर) हे करणार आहेत. तर या कार्यक्रमाला हार्मोनियम वादक प्रसाद शेवडे (देवगड) व तबला वादक अभिजीत जोशी (देवगड) हे संगीत साथ देणार आहेत. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागतोस्तुक अमिता रानडे जोशी व आदिश जोशी यांनी केले आहे.


error: Content is protected !!