दहावीच्या शेवटच्या पेपर दिवशी आईचे निधन

आईला काळजात ठेवून सई ने दिली परिक्षा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सई संतोष सावंत हिने अत्यंत दुःखद प्रसंगातही अपार धैर्य दाखवत आपली परीक्षा पूर्ण केली. शिवडाव ओटोसवाडी येथील रहिवासी असलेली सई ही शिवडाव माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. दहावीच्या परीक्षेचा आज शेवटचा पेपर असताना, काल उशिरा रात्री तिची आई कै. साक्षी सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबावर शोककळा पसरली.

अशा कठीण प्रसंगीही सईने मनाचा धीर न सोडता परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश पवार तसेच शिक्षकांच्या सहकार्याने ती परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि शेवटचा पेपर दिला. सईच्या या जिद्दीचे व धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!