मसुरकर किनई रोडच्या प्रलंबित कामाला नगरसेविका आर्या राणेंनी फोडली वाचा

नगरपंचायत जनरल मीटिंगमध्ये  मांडला किनई रोडचा मुद्दा

कणकवली (प्रतिनिधी) : नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी शहरातील आचरा रोड ते मसुरकर किनई रोड च्या प्रलंबित कामाचा विषय नगरपंचायत च्या आज झालेल्या जनरल मीटिंगमध्ये उचलून धरला. मसुरकर किनई रोड चे टेंडर मंजूर होऊन वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे. बीबीएम कार्पेट सह रस्ता मजबुतीकरण करण्याची जून 2025 मध्ये या कामाची वर्क ऑर्डर निघूनही संबंधीत ठेकेदाराने यंदाच्या पावसाळ्यानंतर मसुरकर किनई रोडवरील केवळ खड्डे बुजवले असून स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांची सदर रस्ता मजबुतीकरण करण्याची आग्रही मागणी आहे याकडे नगरसेविका आर्या राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना या समस्येकडे तात्काळ लक्ष घालून मसुरकर किनई रोड रस्ता मजबुतीकरण व्हावे, अशी मागणी नगरसेविका आर्या राणे यांनी सभागृहात लावून धरली.

error: Content is protected !!