मसूरे (प्रतिनिधी) : फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त 22 डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा हडी जठारवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता दीपप्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार, 10.30 ते 11.00 वैवाहिक जीवनात पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या उभयतांचा सत्कार, सकाळी 11 ते 12 ह. भ. प. हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, 12:30 ते 2 स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थिती चे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष श्रीमती आरती अशोक कदम, कार्यवाह सुभाष वेंगुर्लेकर तसेच संघ पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.