कणकवली महाविद्यालयातील अनिल राणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातील लिपिक अनिल राणे हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल कणकवली महाविद्यालयात त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या शुभहस्ते अनिल राणे यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक महादेव माने, कार्यालयीन अधीक्षक संजय ठाकूर, ज्येष्ठ लिपिक संजय राणे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वाचन संस्कृती बद्दल ज्ञान वाढवणे आवश्यक – विजयकुमार वळंजू

यावेळी विजयकुमार वळंजू यांनी सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. “ग्रंथालयाचा सहवास लाभलेले अनिल राणे हे भाग्यवान कर्मचारी आहेत. प्राध्यापक व विद्यार्थी वर्गामध्ये ग्रंथाची आवड निर्माण होणे व वाचन संस्कृती बद्दल ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्यानेच महाविद्यालय मोठे होत असते व शिक्षण क्षेत्राला चालना मिळत असते” असे प्रतिपादन विजयकुमार वळंजू यांनी यावेळी केले. प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. महादेव माने यांनी याप्रसंगी अनिल राणे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक मंगेश आरेकर यांनी केले व शेवटी उपस्थित त्यांचे आभार डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी मानले.

error: Content is protected !!