खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित व मुंबई विद्यापीठ सलग्न असलेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण खा.पं.शि.प्र.मंडळ खारेपाटण चे विद्यमान अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे,विजय देसाई,मोहन कावळे,योगेश गोडवे, संदेश धुमाळे, राजू वरूणकर व सर्व विश्वस्त, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे व खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांच्या प्रमुख उपस्थित कै.चंद्रकांत परीसा रयबागकर सभागृह येथे पार पडले. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी १)काळाच्या ओघात शेतकरी संपेल का? २)स्त्रियांना आरक्षणाची हमी पण संरक्षण कमी, ३)भारतीय राजकारणातील हरवत चाललेली नैतिकता, ४)जगाला पुन्हा एकदा बुद्धाची गरज,५) महासत्तांच्या संघर्षात पर्यावरणाचा ऱ्हास. या विषयावर स्पर्धकांनी आपले विचार मंथन केले.या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- यश रवींद्र पाटील (बी.के बिर्ला कॉलेज कल्याण), द्वितीय क्रमांक- शुभम निकम (बसवेश्वर कॉलेज लातूर), तृतीय क्रमांक- संकेत पाटील( शिवराज महाविद्यालय कोल्हापूर); तर उत्तेजनार्थ म्हणून सौरभ पेनकुलकर व कु. दीक्षा अंबडकर खारेपाटण कॉलेज यांना गौरवण्यात आले वरील स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून प्रा.वैभव खाणेकर व प्रा.तानाजी गोदडे तसेच प्रा. प्रितम सुर्वे यांनी काम पाहिले. खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.व आभार मानले.