खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कणकवली तालुका स्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सव तथा स्पर्धेत मुलगे मोठा गट कबड्डी या क्रीडा प्रकारात सांघिक यश संपादन करुन प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विद्यार्थ्यांच्या या चमकदार यश प्राप्त केल्याबद्दल खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत असे यश संपादन केल्याबदल खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव ग्रा.प.सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष प्रियंका गुरव,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संध्या पोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर,यांसह केंद्रप्रमुख संजय पवार सर,शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे, खारेपाटण च्या भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या या कणकवली पं.स.प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी कबड्डी या खेळात सांघिक यश संपादन करत पुढील होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला असून खारेपाटण केंद्र शाळेचा मुलगे मोठा गट हा कबड्डीचा संघ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कणकवली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मिलिंद सरकटे धुमक सर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले. नुकत्याच या विजेत्या विद्यार्थ्यांचा खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.