अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचे विशेष योगदान
मसूरे (प्रतिनिधी) : मुंबईतील स्वामी भक्तांंस घेऊन नुतन वर्षाचे औचित्य साधून स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण, स्वामीरत्न पुरस्कार सन्माननीत नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी अक्कलकोट दर्शन सोहळा आयोजित केला होता. यावेळी अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान मठात प्रसिद्ध गायक बाळा कांबळी, शंकर ला. सावंत, सुनील सुर्वे, गायक वादक पप्पु पांचाळ आणि सर्व स्वामी भक्त यांनी स्वामी नामाच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला. वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच पुरातन श्री शुभ्राय महाराज मठ, सोलापूर येथे स्वामी सेवा म्हणून भजन करण्यात आले. या प्रसंगी आपण सर्व फक्त निमित्त आहोत. स्वामी समर्थ महाराज सर्व काही घडवून आणतात असे अक्कलकोट भूषण नंदकुमार तुकाराम पेडणेकर म्हणाले. अक्कलकोट दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष. महेश इंगळे समाधी मठातील चोळप्पा महाराजांचे सोळावे वंशज अन्नु गुरूजी, अन्नछत्राचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले, युवराज अमोल राजे भोसले यांनी सुद्धा नंदकुमार पेडणेकर यांचे स्वागत करत उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.












